कोलकाता-वृत्तसंस्था | अनुराग कश्यप यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकावर शोषणाचा आरोप केल्याने चर्चेत आलेल्या रूपा दत्ता या अभिनेत्रीला चक्क पाकिटमारीच्या आरोपातून अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री रूपा दत्ताला पोलिसांनी पाकिटमारच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ती बंगाली चित्रपट इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री आहे. रुपा हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. कोलकातामध्ये सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी रुपाला कचर्यात बॅग फेकताना पाहिलं होतं. यानंतर तिची चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला असून रुपाच्या बॅगमधून पोलिसांनी ७५ हजार रुपये हस्तगत केले आहेत. तिने आपण पाकिटमारी केल्याचे मान्य केले आहे.
२०२० मध्ये रूपा त्यावेळी चर्चेत आली, जेव्हा तिने बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिने अश्लिल मेसेज पाठवण्याचाही आरोप केला होता. तिचं म्हणणं होतं की, अनुराग कश्यपने तिला फेसबुकवर अश्लिल मेसेज पाठवले होते.
इतकचं नाही तर रूपाने अनुराग कश्यपवर ड्रग घेतल्याचा आरोप केला होता. याचबरोबर तिने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती. तपासानंतर समजलं होतं की, रूपाला मेसेज पाठवणारा व्यक्ती अनुराग कश्यप नाही. तर कुणी दुसरा अनुराग होता. त्यामुळे रूपाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निघाले.
रूपा दत्ता हिने टीव्ही शो ‘जय मां वैष्णो देवी’ मध्ये भूमिका साकारलीय. याशिवाय तिने लेखिका, दिग्दर्शिका आणि सामाजिक कार्यकर्ती असा उल्लेख केला आहे.