पाकिस्तानचा कांगावा:एफ-१६ प्रकरणी सत्याचा विजय-इम्रान खान

aa Cover k9ag8sgo0d2b0htfhrv2r970v3 20180923021902

इस्लाबामाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी अमेरिकी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला होता. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-१६ विमान पाडले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्यावर ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हीच खरी नीती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आणि पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडण्याच्या मुद्द्यांवरूनच भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोदींचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील कोणतेही एफ-१६ विमान गायब नसल्याचे अमेरिकेने सांगितल्याची आठवणही इम्रान खान यांनी करून दिली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-१६ विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला होता. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-१६ विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे. ”विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान पाकव्याप्त काश्मीरच्या सात ते आठ कि.मी. आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या एफ-१६ विमानांपैकी एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे.

Add Comment

Protected Content