पाकिस्तान नरमलं ; भारताला चर्चेचं निमंत्रण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर सीमारेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यांनी तो हाणून पाडला. दरम्यान भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर युद्धाची भाषा करणारे पाकिस्तान नरमले असून पाकिस्तान सैन्याकडून भारताला चर्चेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे.

 

मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे. दरम्यान, पाकिस्तान सैन्याकडून भारताला चर्चेचे निमंत्रण दिल्याचे कळते. एकंदरीत पाकिस्तान नरमले असल्याचे दिसतेय.

Add Comment

Protected Content