इस्लामाबाद (वृत्तसंस्था) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिलाय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. सोमवारपासून आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
कुरैशी यांनी सांगितले की, काश्मीरची सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने 8 ऑगस्टला भारतासाठी आपला हवाई मार्ग बंद केल्याची घोषणा केली होती. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानमधून जाणाऱ्या 9 मार्गांपैकी 3 मार्ग पाकिस्तानने सध्या बंद केले आहेत. पाकिस्तानचा हवाई मार्ग बंद झाल्याने सध्या भारतीय विमानांना यूरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व देशांकडे जाण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे.