जम्मू (वृत्तसंस्था) पाकिस्तानी लष्कराच्या विमानांनी बॉम्ब वर्षाव करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील भारतीय लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाक विमानांनी फेकलेले बॉम्ब भारतीय लष्करी छावण्यांच्या आसपास कोसळले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारतीय लष्कराच्या छावण्या उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नांत या विमानांनी राजौरी भागात बॉम्ब वर्षाव केला. आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानांनी घुसखोरी केली. पाकच्या एकूण ३ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे बॉम्ब भारतीय लष्करी छावण्यांवर न पडता, ते इतरस्त्र कोसळले, असे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गस्त घालत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकच्या विमानांना हुसकावून लावले.