बँकॉक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | थायलंडमध्ये संसदेने पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली आहे. माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या त्या कन्या आहेत. ३७ वर्षीय पाइतोंग्तार्न या देशाच्या 31 व्या पंतप्रधान बनल्या आहेत. थायलंडच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान, तसेच हे पद भूषवणाऱ्या देशातील दुसऱ्या महिलाही आहेत.
यिंगलक या थायलंडच्या पंतप्रधान झालेल्या देशातील पहिल्या महिला होत्या. त्या पाइतोंग्तार्न यांच्या मावशी आहेत. पाइतोंग्तार्न या शिनावात्रा कुटुंबातील पंतप्रधान बनलेल्या तिसऱ्या नेत्या आहेत. थाक्सिन यांचे मेहुणे सोमचाई वोंगसावत यांनीही 2008 मध्ये थायलंडचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. थाक्सिन 2001 मध्ये थायलंडचे पंतप्रधान झाले. थाक्सिन शिनावात्रा यांची सत्तापालटाच्या माध्यमातून सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. पाइतोंग्तार्न या सत्ताधारी पक्ष ‘फेउ थाई’च्या नेत्या आहेत. तथापि, पाइतोंग्तार्न अद्याप खासदार नाहीत.