शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे शिक्षक दिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण २३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

सदर स्पर्धा ह्या तीन गटात घेण्यात आल्या त्यात प्राथमिक गट, माध्यमिक गट व महाविद्यालयीन/ खुला गट असे होते. प्राथमिक गटात १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, माध्यमिक गटात १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि महाविद्यालयीन/ खुल्या गटात ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्राथमिक गटासाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालया तर्फे रंग व चित्र देण्यात आले होते. माध्यमिक गटासाठी विषय भारताची राष्ट्रीय प्रतीके हा देण्यात आला होता. तसेच महाविद्यालयीन/ खुल्या गटासाठी तीन विषय देण्यात आले होते. १) जरा याद उन्हे भी करलो २) स्वातंत्र्य संग्रामात खान्देशातील क्रांतिकारकांचे योगदान ३) स्वर्णिम युगाकडे भारताची वाटचाल हे होते.
स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास १००१ /- रुपये रोख, द्वितीय क्रमांकास ७०१ /- रुपये रोख, तृतीय क्रमांकास ५०१ /- रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
प्राथमिक गट-
1.    प्रथम क्रमांक- कार्तिक तुषार मोरे- जी.पी.व्ही. पी.प्राथमिक शाळा जळगाव
2.    द्वितीय क्रमांक – दिशा राजेंद्र धाडे -जी.पी.व्ही. पी.प्राथमिक शाळा जळगाव
3.    तृतीय क्रमांक – पुजा समाधान सुतार -जी.पी.व्ही. पी.प्राथमिक शाळा जळगाव

माध्यमिक गट –
1.    प्रथम क्रमांक-  देवदत्त  सुनील जोशी -ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव
2.    द्वितीय क्रमांक – प्राजक्ता मिलिंद कोल्हे-ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव
3.    तृतीय क्रमांक – अजिंक्य पंकज सोनार -ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव
4.    उत्तेजनार्थ- अयुष अनिल ठाकूर -ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव

महाविद्यालयीन गट  / खुला-
1.    प्रथम क्रमांक- गायत्री दिलीप कुमावत- ओजस्विनी महाविद्यालय जळगाव
2.    द्वितीय क्रमांक – जान्हवी अजय चांगरे -ओजस्विनी महाविद्यालय जळगाव
3.    तृतीय क्रमांक – पुनम विजय लोखंडे – केसीई शिक्षणशास्त्र महा. जळगाव
4.    उत्तेजनार्थ – शेख महेक मोहम्मद सलमान – बी.जी. पाटील इंग्लिश स्कुल पाळधी जलगाव

सदर स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी तसेच प्राध्यापक गण उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून सतिश भोळे, प्रा.संदीप केदार, प्रा. निलेश जोशी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.प्रविण कोल्हे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेकरिता ओजस्विनी कला महाविद्यालयाचे संचालक मिलन भामरे, पियुष बडगुजर, डॉ.गणेश पाटील, प्रा.किसान पावरा, प्रा.अतुल गोरडे, प्रा.पंकज पाटील, प्रा.केतकी सोनार, मोहन चौधरी, निलेश नाईक, संजय जुमनाखे, विजय चव्हाण, केतन पाटील, रोहित पाटील, निलेश सदाफळे विद्यार्थी आकाश धनगर, तुषार पाटील यांनी अनमोल सहकार्य केले.

 

Protected Content