पहूर येथे खड्ड्यात पडल्याने वयोवृद्ध जखमी

pahur news

 

पहूर, प्रतिनिधी । पहूर पेठ येथे मज्जीदकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात 95 वर्षीय वृद्ध पडून जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील अनेक खड्ड्यांकडे पहूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे अशी ओरड नागरिकांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथील मज्जीदकडे कन्हैया छगन परदेशी यांच्या घराजवळ रस्त्यावर नालीलगत भला मोठा खड्ड्डे दोन ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पडला असून याबाबत छगन परदेशी यांनी पहूर पेठ ग्रामपंचायतीला वेळोवेळी तोंडी सुचना देवून ही ग्रामपंचायतीने काना डोळा करून दुर्लक्ष केले.
नुकतेच रस्त्याने पायी जात असलेले न्याज मोहम्मद शेखलाल वय (95) रा.पहूर पेठ बडा मोहल्ला येथील रहिवासी हे या गड्यात पडल्याने जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर खुप दुखापत झाली. छगन परदेशी यांच्या तोंडी सुचनेची वेळीच दखल ग्रामपंचायतीने घेतली असती तर ही घटना घडली नसती. पहूर पेठ ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून हे गड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर रस्त्यावर वाहणे चालविणेही कठीण झाले असून पायी चालणाऱ्यांचेही जीव मुठीत घेऊन चालावे लागते आहे.

Protected Content