पहूर, ता . जामनेर ( प्रतिनिधी ) दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पहूरपेठ गावाला पाणीदार करण्यासाठी पहूरचे भुमीपुत्र तसेच ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी दिपक पंढरीनाथ पाटील यांनी श्रमदान केले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पहूर पेठ गावाने सहभाग घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कामे सुरू आहेत. केवडीनाल्यावऱ ३ माती बांध,१ सिमेन्ट बांधची डागडुजी , 1 शेततळे , वाघुर नदितील जुण्या शेवडीतील गाळ काढण्यात आला. पंढरीनाथ पाटील यांनी पहूरपेठ गावासाठी ५० तास जेसीबी यंत्र , ५ टिकम ,५ फावडे ,५ टोपले देवून पाणी फाऊंडेशनच्या कार्याला गती दिली. ऊद्या गावात शोषखड्याचे नियोजन आहे तर महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जलयोध्दे यांची भूमिका महत्वाची
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मीना भोई ,विद्या कुमावत ,सुषमा चव्हाण , बेलपत्रे ताई, रामेश्वर पाटील , रवींद्र पांढरे, भावऱाव गोधनखेडे, ज्ञानेश्वर घोलप ,सुनिल सोनार ,भारत पाटिल, संतोष चिंचोले ,बाबुराव पाटिल ,सचिन पाटिल हे जलयोध्याचे काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीं कामाने गती घेतली आहे.
व्हॅटस अॅपगृप ठरतोय प्रेरणास्रोत
सोशल मिडीयाचा सुयोग्य वापर करत ‘पाणी फाऊंडेशन ‘ व्हॉटस अॅप गृप तयार करण्यात आला असून त्यात अधिकारी,गांवकरी, तरूण कार्यकर्ते यांना समाविष्ठ करण्यात आले आहे. नोकरी , व्यवसायाच्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या भूमीपुत्रांमध्ये समन्वय साधल्या जात असून हा गृप गाव पाणीदार होण्यासाठी प्रेरणास्रोत बनला आहे.