पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे अलीकडेच मोठी कारवाई झाल्यानंतरही अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून आले असून पुन्हा एका अड्डयावर धाड टाकून एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, पहूर पेठ येथील बडामोहल्ला परिसरात दोन दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका जुगार अड्यावर धाड टाकून पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. एवढी मोठी कारवाई होऊनही सट्टा जुगार सुरूच असल्याने मंगळवारी सायंकाळी पहूर पोलीस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल, व पीएसआय बर्गे यांनी बसस्थानक परिसरातील मुतारीच्या मागे सट्टा जुगार खेळताना आरोपी समाधान भानुदास बाविस्कर( वय २८)रा. पहूर कसबे यास ११०० रूपये रोख व सट्टाजुगाराच्या साहित्यासह आढळून आला. या संदर्भात, समाधान भानुदास बाविस्कर वय २८ रा.पहूर कसबे याचे विरूद्ध भाग ६ गु.र.नं.४८/२०१९ मुंबई जुगार अँक्ट १२अ प्रमाणे आरोपीस अटक करून सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल, पीएसआय किरण बर्गे,ए.एस. आय. अनिल अहिरे, अनिल राठोड हे तपास करीत आहे. दरम्यान, परिसरात अवैध धंदे सुरूच असल्याचे दिसून आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.