पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पहूर कसबे गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन समाजकंटकांनी फोडल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलीसात तक्रार नोंदविली आहे.
पहू कसबे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गोगडी धरणातून गावाला पाणी पुरवठा केला जात होता. यंदा डिसेंबर मध्ये च धरणातील पाणी साठा संपूष्टात आल्यामुळे ग्रामपंचायत कडून गावाला सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणातून पाणी पुरवठा सुरु केला असता अज्ञातांनी पाणी पुरवठा होणारी पाईप लाईन फोडल्याने पुन्हा गावाचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. या संदर्भात सरंपच कसबे ज्योती शंकर घोंगडे यांनी पहूर पोलिसांत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच तालुक्याच्या टंचाई विभागाडे टँकरच्या मागणी चा प्रस्ताव सादर केला आहे. पण प्रशासनाने आद्यपही एक टँकर दिले नसल्याची माहिती सरंपच ज्योती घोंगडे यांनी सांगितले आहे. एकंदरीत पहूर कसबे गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. परीसरात कोणत्याही धरणात जलसाठे शिल्लक नसल्याने कसबे ग्रामपंचायतची दमछाक होतांना दिसून येत आहे.