अमळनेरातील शिवाजी उद्यानात शनिवारी रंगणार ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम

padva pahat

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात विविध उपक्रमामुळे अत्यंत प्रसिद्धी झोतात असलेला श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि 6 एप्रिल रोजी गुढी पाडव्याला ‘पाडवा पहाट’ या संगीतमयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शनिवार दि 6 एप्रिल रोजी पहाटे 5.30 ते 7.30 यावेळेत श्री शिवाजी उद्यान,न्यू प्लॉट,अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अमळनेर येथील प्रसिद्ध शहनाई वादक संजय जी गुरव व सध्यस्थीतीत सुमधुर आवाजामुळे अत्यंत प्रसिद्धी झोतात असलेले गायक श्री देवर्षी गुरव यांचा सुप्रसिद्ध ग्रुप मराठी व हिंदीतील भावगीत,भक्ती गीत यासह विविध गीते सादर करून पहाटेच्या गारव्यात सुखद असा आनंद देणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ललित मोमाया व स्नेहल मोमाया यांची लाभणार असून त्यांच्या शुभहस्ते गुढी पूजन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण होऊन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. तरी या संस्कृतीक कार्यक्रमाचा तमाम अमळनेर वासीयांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप,अमळनेर तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,(संघटना)अमळनेर यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content