रावेर, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा नियोजन समितीवर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे.
पद्माकर महाजन हे शहरातील मुळ रहिवासी असून यापूर्वी नगरपालिकेत त्यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते भाजपाचे निष्ठावान सदस्य असून त्यांच्या याच कामाची दखल घेऊन ना. महाजन यांनी त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल आ. हरिभाऊ जावळे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी पं. स. सदस्य गोपाळ नेमाडे आदींनी त्यांचे अभीनंदन केले आहे.