यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामसभा सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच गुणवंती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन करून कायम करण्यात आले. त्यानंतर आलेले शासकीय परिपत्रक वाचून दाखवण्यात आले. यात आयत्यावेळी आलेल्या विषयात रमेश रामा भोई यांनी देशी दारूचे लायसन्स मिळण्यासाठी ठरावासह लेखी अर्ज दिल्याने सरपंचासह सर्वेच आवाक झाले.
सरपंच पाटील यांनी आदर्श गाव असताना असे देणे उचित ठरणार नाही असे सांगितल्याने लगेच नामदेव कोळी यांनी आदर्श गावाचा प्रमाणपत्र कुठे आहे ते दाखवा. गावातील अवैध धंदे बिनधास्तपणे जर सुरू आहेत तर मला ठराव करण्यास कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतची हरकत नसावी. या पूर्वीच्या ग्रामसभेत अवैध धंद्यावाल्यांचे नावाने ठराव दिलेले आहेत. याची आठवण देखील रमेश भोई यांनी ग्रामसभेला करून दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण पाठपुरावा करत नसल्याने अवैध धंदे फोपावत आहे. असा आरोप देखील करण्यात आला. यानंतर घरकुल यादीत घरकुल मंजूर असताना गेल्या 7-8 वर्षांपासून घरकुलच करण्यात आले नाही, याबाबत विचारले असता ती बिपीएल यादी बंद झाल्याने घरकुल झाले नाहीत असे ग्रामविकास अधिकारी वाघमारे यांनी ग्रामस्थांना सांगितल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले.
यापूर्वी घरकुल यादीत मंजूर असताना ग्रामपंचायती च्या अकार्यक्षमतेमुळे ते झाले नसल्याने पुन्हा प्रधानमंत्री निवास साठी नवीन प्रस्ताव कसे देणार ? असा सवाल देखील नागरिकांकडून विचारण्यात आला पूर्वीच्या मंजूर घरकुलांचे काय? त्याचप्रमाणे कोळीवाड्यातील अतिक्रमण काढण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी अर्ज दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमदार व खासदार निधी चा फंड आल्यानंतर त्यातील काम निकृष्ट दर्जाचे होऊन ते त्यात भ्रष्टाचार होत असल्याचे देखील रमेश भोई यांनी लेखाजोखा ग्रामस्थांना दिला. त्याचप्रमाणे मराठी शाळेवरील वादळवाऱ्यातील पत्रे उडून गेल्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यात जागा नसते निदर्शनास आणून दिले. सरपंच यांनी लगेच ते काम करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बाजार येथील ६८ लाभार्थ्यांचे केवायसी आधार लिंक बँक खाते करून घेण्या घेतल्या असे कृषी सहाय्यक गणेश बाविस्कर यांनी वाचन करून सोशल करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ग्रामसभा संपन्न करण्यात आली व सरपंच यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
याप्रसंगी तलाठी भूषण सूर्यवंशी कृषी सहाय्यक गणेश बाविस्कर पोलीस पाटील सुरेश खैरनार सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.