अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने पाडळसरे धरणाच्या कामासाठी आज नाट्यगृह येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले तापी नदीवरील पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिले गेल्याने अमळनेरसह आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासह शेतजमिन सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी धरणाची किंमत आणि अमळनेरकरांचा खदखदणारा असंतोष प्रदीर्घ काळ सुरू राहणार्या उपोषण आंदोलनातून व्यक्त होत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास नाट्यगृह येथिल छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी पुष्प अर्पण करित वंदन केले. शिव घोषासह पाडळसरे धरण झालेच पाहिजे च्या घोषणा देत आंदोलनकर्ते नाट्यगृह ,मंगलमूर्ती पतपेढी, प्रबुद्ध कॉलनी,कोर्ट रोड, विश्रामगृह, बळिराजा स्मारक मार्गे तहसिल काचेरीसमोरील उपोषण स्थळी पोहोचले. याप्रसंगी तापी नदीच्या पाण्याचे जलपूजन करून उपोषण आंदोलनास सुरवात करण्यात आली.
उपोषण आंदोलनात पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटील, एस.एम.पाटिल. योगेश पाटील,रामराव पवार, डी.एम.पाटील, एन.के.पाटील, रविंद्र पाटील, अजयसिंग पाटिल, सुनिल पाटिल, सतिश काटे, आर.व्ही.पाटील, सुनिल पवार,देविदास देसले, रणजित शिंदे,महेश पाटिल, पुरुषोत्तम शेटे, आर.बी.पाटील,दिलीप पाटील,मेहमूद बागवान, रियाजुद्दीन आदी समितीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक,युवक, सामाजिक व राजकीय कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.
या आंदोलनास माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, काँगेस प्रदेश सरचिटणीस सौ.ललीताताई पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँक संचालिका सौ.तिलोत्तमाताई पाटील, जळगावचे माजी महापौर किशोर पाटील, चोपडा येथिल सामजिक व राजकिय कार्यकर्त्या सौ.माधुरी किशोर पाटिल, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष एस.बी.पाटील आदिंसह शैक्षणिक संस्थाचालक व.ता.पाटील, डी. डी. पाटील, प्रा.अशोक पवार, प्रा.गणेश पवार, निवृत्त प्रांताधिकारी एच.टी.माळी, वकील संघाचे अध्यक्ष किरण बागुल, मारवाड सरपंच उमेश पाटील, राजेंद्र निकम,ओम साई सेवा समिती चे वतीने संजय चौधरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव दौलत पाटील, जिल्हा बँकेचे मा.व्हाईस चेअरमन नानागीर गोसावी, कृ. उ.बा संचालक सुरेश पिरण पाटील, जेष्ठ नागरिक सानेगुरुजी मंडळचे व ठेवीदार संघाचे उमाकांत नाईक, अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, युथ सेवा फाउंडेशनचे रियाजुद्दीन शेख व सहकारी अजबराव पाटील,व्यापारी युनियनचे चंद्रकांत साळी,रमेश पाटील,तळवाडे,ऍड.तिलोत्तमा पाटील,डॉ.प्रशांत शिंदे,सौ.सुलोचना पाटील,आदिंसह वेगवेगळ्या गावातून दिवसभर ग्रामस्थ शेतकरी व शहरातील नागरिक दिवसभर सहभागी झाले.
पहा– उपोषणाबाबत सुभाष चौधरी सांगत आहेत संघर्ष समितीची भूमिका.