पाडळसा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे गुरूजनांच्या हस्ते शिष्यवृत्ती परिक्षेच्या यशाबद्दल सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पाडळसा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इ.२री च्या विद्यार्थ्यांना मंथन या शिष्यवृत्तीच्या पुर्व परिक्षेस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुरूजनांनी गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.

पाडळसा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संपन्न झालेल्या या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात शिक्षिका ज्योती सनेर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणीकदृष्टया मेहनतीने तयार करून या शिष्यवृत्ती परिक्षेस बसवून भुसावळ येथे संपन्न झालेल्या परिक्षेत पाडळसा गावातील सहा विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले तसेच विद्यार्थी नरेंद्र गोपाळ नाथ या विद्यार्थ्याचा यावल तालुक्यातुन चौदावा तर आपल्या शाळेतून पहिला क्रमांक आल्याने शिक्षिका सौ.ज्योती सेनर यांनी ५००रू. रोख वही, पेन, प्रमाणपत्र देऊन तर इतर विद्यार्थ्यांना वही, पेन, प्रमाणपत्र शा.व्य.स.अध्यक्ष खेमचंद कोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका कविता फिरके, उपशिक्षक सुनील पाटील, शिक्षिका ज्योती सनेर, वंदना पाटील, शिक्षक जितेन्द्र फिरके, मंगलेश पाटील, पालक माता रेणुका नाथ, कविता कोळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गुणगौरव सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मान्यवरांसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष खेमचंद कोळी यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार सौ.ज्योती सनेर यांनी मानले.

Protected Content