पाडळसे येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात

yaval padalase

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसे येथील लोकविद्यालयात नुकतेचे तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्योत्सवात २२ शाळेतील १२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, यात प्रथम क्रमांक पी.एस.एम.एस स्कुल, बामणोद ला मिळाले तर द्वितीय क्रमांक हे लोकविद्यालय पाडळसे या शाळेने मिळविले आहे. यासाठी विज्ञान आणि समाज हा मुख्य विषय होता. चार उपविषय होते ते पुढीलप्रमाणे यात गांधी आणि विज्ञान, स्वछता स्वास्थ आणि आरोग्य, आवर्तण सारणी, हरित आणि स्वच्छ ऊर्जा यापैकी प्रथम क्रमांक मिळविलेली शाळा जिल्हास्तरावर यावल तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सोवात २३ शाळांमधील १२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अभिनयातील आवड असल्याचे लक्षात आले असून ही बाब कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन यावल पं.स.चे गटशिक्षणाधिकारी एजाज शेख व केंद्र प्रमुख भागवत पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यावल तालुका विज्ञान समन्वयक डॉ.नरेंद्र महाले यांनी केले. मुख्याध्यापक एस.आर.चौधरी व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून गणेश जावळे, हेमंत पाटील व विनोद नारखेडे यांनी केले.

Protected Content