पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जारगाव नाथमंदीरात रविवारी २६ जून रोजी राष्ट्रीय संघर्ष समितीचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष अशोक राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यास राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग रजावत, पच्छीम महाराष्ट्र मुख्य समन्वयक सरिता वानखेडे, राष्ट्रीय सल्लागार पी.एन. पाटील, मुख्य समन्वयक बुलढाणा येथील विलासराव पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभा आरस, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एस.एन. आंबेकर, क्षेत्रीय संघपना सचिव सुभाष पोखरकर तर प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव, जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे, पिंप्री चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, जळगांव जिल्हा सचिव रमेश नेमाडे, व जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
२६ रोजी रविवारी सकाळी दहा वाजता नाथमंदिर येथे होत असलेल्या भव्य मेळाव्यात इपीएससी, एसटी महामंडळ, जिल्हा बँक, पतसंस्था, साखर कारखाने, एम. आय. डी. सी., सुतगिरणी, गटसचिव, सह १८७ आस्थापना मधील सेवानिवृत्त कर्मचारी यांना अत्यल्प पेन्शन मिळत असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवधनुष्य हाती घेण्यात आले आहे. या कार्यक्रमास स्वागत व प्रस्तावना जळगांव जिल्हा समन्वयक अनिल पवार हे करणार आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष नंदलाल बोदडे, प्रकाश शमदाणी, दिलीप झोपे, रविंद्र कोतकर, भिकन मनोरे, हरीष अदगवाल, एस. आर. पाटील, गुलाबराव जाधव, वसंत गवांदे, विश्वास मराठे, सधीर पाटील, राजेंद्र चव्हाण, सुभाष पाटील, सुरेश पाटील, शिवाजी महाजन, प्रकाश बेंडाळे महिला प्रतिनिधी सुरेखा पाटील, आशा महाले उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.