पाचोर्‍यातून जनआशिर्वाद यात्रेस प्रारंभ ( व्हिडीओ )

sivsena

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ १८ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यासह पाचोरा भडगावं मतदार संघातुन होत असून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे खान्देशात भगवे चैतन्यमय वातावरण पसरले आहे.

भडगावं मतदारसंघासह जळगाव ग्रामीण-धरणगाव, एरंडोल, चोपडा व अमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रांत जनआशीर्वाद यात्रा जाणार असून आदित्य ठाकरे यांनी पहिला संवाद किशोर पाटील यांच्या मतदारसंघात केला आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या संवादात लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते देण्या-याचे आभार मानायचे तर ज्यांनी मते नाही दिली त्यांची मने जिंकायचा पहिला विजय पाचोरा भडगावं मतदारसंघातील आ. किशोर पाटील यांचा प्रयत्नातून यशस्वी झाला होता. मुंबई येथून विमानाने 18 जुलै रोजी आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन झाले. त्यानंतर जळगावच्या किसनजीनगरातील प्रसिद्ध गणपती मंदिरात आदित्य ठाकरे हे पूजा करून आ. किशोर पाटील यांच्या पाचोरा मतदारसंघात मार्गस्थ झाले होते. ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी नाही दिले, त्यांची मने जिंकायची आहेत असा विश्वास व्यक्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरुवात झाली आहे.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज पाचोऱ्यात आगमन होताच शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी जंगी स्वागत केले. जळगाव ग्रामीण विधानसभात स्वागत झाल्यावर सकाळी दु १ वाजता पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर याठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेच्या व्यासपीठवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, युवासेनेचे सचिव सरदेसाई, संपर्कप्रमुख विलास पारकर व संजय सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होते. जनआशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी आ. किशोर पाटील, मुकूंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि.प. सदस्य परमसिंग पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, अरुण पाटील, शरद पाटील, नगरसेवक सतीश चढे, राम केशवानी, दादाभाऊ चौधरी, युवा सेनेचे संदीप राजे, पाटील जितू पेंढारकर अनिकेत सुरवंशी, गणेश चोधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकानी केली होती. या आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रासाठी पाचोऱ्यात पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी ट्राफिकपासून तर सिटी पोलीससह कडक बंदोबस्त केला होता.

Protected Content