पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील चिंतामणी कॉलनीतील रहिवासी व मुळचे वडगाव असेरी गावाचा रहिवासी अद्वैत हिरालाल पाटील यांचे चिरंजीव वितराग अद्वैत पाटील (वय – २२) यांचे दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
वितराज अद्वैत पाटील यांच्या पार्थिवावर आज ३० बुधवार रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. चि. वितराग हा नाशिक येथे मिल्ट्री कॅम्प मधे अधिकारी पदाचे शिक्षण घेत होता. तो अचानक आजारी पडल्याने त्याचे निधन झाल्याने त्याचे देशसेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यास एक बहिण असून ती परदेशात वैद्यकिय शिक्षण घेत आहे.
वितराग हा अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांचा भाचा तर कुरंगी – बांबरुड गटाचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांचा पुतण्या होत. वितराग हा आई, वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे निधनाने वडगांव असेरी व चिंतामणी कॉलनीत मोठी शोककळा पसरली आहे.