पाचोरा प्रतिनिधी । वाळू चोरी प्रकरणात पोलीसांच्या भूमिकेवर तहसीलदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाळू चोरीबाबत तहसीलदार श्री. चावडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी पदभार घेतल्या पासून गेल्या चार महिन्यात सुमारे १८,लाख २०,०००/-एवढ्या दंडात्मक कार्यवाह्या केल्या. जिल्ह्यात पाचोरा तहसील दुसर्या क्रमांकावर आहे. सद्यस्थितीला १६ ते १७ वाहने कार्यवाह्या साठी तहसिल आवारात उभी आहे. पाचोरा तालुक्यात वाळूचोरी समस्या गंभीर आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनात व आदेशाने मी स्वतः,सोबत नायब तहसीलदार, सर्कल,विवीध विभागाचे सर्कल, तलाठी व कर्मचारी तत्पर आहेत. महसुल विभागाने चार महिन्यात वाळू चोरी संदर्भात सुमारे विस लाखांच्या दंडात्मक कार्यवाह्या केल्या आहेत. नगरदेवळा परिसरात सापडलेल्या अवैध वाळू साठेबाजी करणा़र्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. विभागात कर्मचारी संख्या मोजकी व कामांचा ताण असला तरी वाळू चोरांवर कार्यवाह्या सुरूच असतात.बर्याच वेळी कार्यवाही करतांना पोलिसांची मदत घ्यावी लागते. महसूल विभागाच्या परवानगी शिवाय पोलिस प्रशासनातील कोणालाही अवैध वाळू चोरी करणार्या वाहनांना पकडण्याचे किंवा कार्यवाहिचे अधिकार नाही.परंतु काही पोलीस कायद्याचा गैरवापर करून वाळूची वाहने पकडून तोडपाणी आणि हप्तेखोरी करीत असल्याच्या तक्रारी महसुल विभागाकडे वाढल्या असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.
तहसीलदार चावडे पुढे म्हणाले की, पोलीस विभागातील काही कर्मचारी अधिकाराचा गैरवापर करून वाळू चोरीची वाहने पकडणे, जागेवर तोडी करणे,हप्ते घेणे असे प्रकार करीत असल्याच्या चर्चा आहे. यामुळे पोलिस व महसुल विभागाच्या अधिकाऱयांची बदनांमी होत आहे.अश्या कर्मचाऱयांचा अहवाल पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्या कडे पाठविण्यात येईल. वाळू चोरटे व वाळू चोरी बाबत जागरूक नागरिकांनी महसुल विभागास लेखी किंवा तोंडी कळविण्याचे देखील आवाहन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.