जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | २९ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असून यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर-बोद वड रस्त्यावर अवैधपणे ताडी(मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील ४०० लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले असुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.
पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई !
12 months ago
No Comments