Home अर्थ पाचोरा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप ; भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा

पाचोरा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप ; भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा

0
47

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आगारातील एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांनी एस. टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणींसह अनेक मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असून भारतीय मजदूर संघातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.

भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष पी. जे. पाटील व न. पा.  म. न. पा. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज नारायण पाटील यांनी आंदोलन स्थळी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली व संपास पाठींबा दिला भारतीय मजदूर संघ प्रणीत महाराष्ट्र मोटार कामगार संघ हि संघटना एस. टी. महामंडळातच असुन सुरवाती पासुनच संपात सहभागी असल्याची माहिती देण्यात आली. सदर संघटना संपात सहभागी असल्याचे पी. जे. पाटील यांनी सांगितले शासनाने अधिक काळ मागणी लांबवून न-धरता कामगारांच्या न्यायीक मागणीस मान्यता देवून त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करून उपोषणास जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असे मत व्यक्त केले.


Protected Content

Play sound