पाचोरा प्रतिनिधी । येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त याच्या लोकार्पणाचे नियोजन होते. तथापि, सध्या आचार संहिता सुरू असल्यामुळे हे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले असून नंतर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आज किशोरआप्पा पाटील यांनी दिली. दरम्यान, प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुकुंद बिल्दीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते. यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यात किशोरआप्पा पाटील हेदेखील सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख भागातून ही रॅली काढण्यात आली. याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटे मुकुंद बिल्दीकर स्वराज ग्रुपचे अध्यक्ष डॉ भूषण मगर युवा नेते अमोल शिंदे, नगरसेवक विकास पाटील, दत्ता बोरसे, गणेश पाटील, गंगाराम पाटील, संभाजी बिग्रेडचे जिल्हा सल्लागार लक्ष्मण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मुकेश तुपे, राजे संभाजी युवा फाऊंडेशन भूषण देशमुख, प्रवीण पाटील, गजानन पाटील, गणेश पाटील, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील, वीर मराठा मावळा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश शिंदे, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, दीपक पाटील, स्वराज फाऊंडेशनचे लकी पाटील, बापू हटकर, राहुल बोरसे, रवी देवरे, गणेश पाटील, पाटील, दीपक पाटील, संदीप राजे पाटील, लक्ष्मण ( लकी )पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील राहुल पाटील, सुरेश दळवी, मंदाताई पाटील, संगीत पगारे, किरणबाई पाटील, ऊर्मिला शेळके, कल्पना पाटील, सुनंदा पाटील, मीनाक्षी मोरे, रंजना आमले, सिधुताई पाटील, रुपाली अमृतकर, आरती शर्मा यांच्यासह संभाजी बिग्रेड मराठा सेवा संघ वीर मराठा मावळा संघटना, स्वराज ग्रुप, जिजाऊ ब्रिगेड, राजे संभाजी युवा फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
पहा : जयंती उत्सवाचा व्हिडीओ.