पाचोरा, प्रतिनीधी | येथील सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांनी शिक्षक ऑफलाईन मार्गदर्शन करत असून या पॅटर्नचे कौतुक करण्यात येत आहे.
कोरोना महामारी च्या काळात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. बंद दरम्यान विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडू नये याकरिता संस्थेचे चेअरमन संजय वाघ, स्कूल कमिटी चेअरमन जगदीश सोनार व शाळेचे मुख्याध्यापक नारायण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपडु भादु पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शाळा बंद शिक्षण सुरू या मोहिमेअंतर्गत जवळपास एक हजार विद्यार्थी गुगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
याच्या जोडीला क्षेत्र भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जातो व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश प्रक्रिया आपल्या दारी हा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात राबविण्यात आला आहे. बंद काळात हि ऑनलाईन पध्दतीने शिक्षक आपल्या पाल्यांना शिक्षण देतात. म्हणून पालकांनी शिक्षक व विद्यालयाचे कौतुक केले आहे. मुख्याध्यापक नारायण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मनोज पवार, रविंद्र महाले, स्वप्नील माने, राकेश पाटील, ईश्वर पाटील, अभिजीत महालपुरे, धर्मराज पाटील यांच्यासह महिला शिक्षिका कार्य करित आहेत.