पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील पोलीस कर्मचार्याच्या विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली.
पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे.
पाचोरा येथील पोलिस उपाधिक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येवून गणपती साठी घरी आला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी गेला असता विजेचा आदित्य यास विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाला.
मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयत अदित्य यास एक बहिण असून ती पूणे येथे अभियंत्रीकीचे शिक्षण घेत आहे. त्याचे पाच्छात आई, वडील एक बहीण असा परिवार असून त्याचे मृत्यूमूळे पोलिस लाईनित शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने पाचोरा पोलिस लाईन मधील रहीवाशी पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवाराचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन पोलिस लाईन परिसर हा विविध कारणांमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला असुन याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होत आहे.