पाचोरा प्रतिनिधी । चारचाकी वाहन पलटून आपली पत्नी अपघातात ठार झाल्याचा बनाव अखेर उघड झाला आहे. या प्रकरणी पतीसह त्याच्या घरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अटक करण्यात आलेला पती हा कोरोना पॉझिटीव्ह आल्याने या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढला आहे. www.livetrends.news
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या २३ वर्षाच्या विवाहीतेस पतीने जीवे ठार मारून अपघाताचा बनाव करत गुन्हा लपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पतीने मयत पत्नीस सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी असलेल्या बहिणीच्या घरी नेण्याचा बहाणा करून तालुक्यातील आंबे वडगाव जवळ वाहनाचा खोटा अपघात घडविला. त्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची खबर पत्नीच्या वडिलांना दिली. मात्र वाहन पलटी होऊनही पतीस साधे खरचटले सुध्दा नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय बळावून व मयताच्या आईने माझ्या मुलीला जावयाने प्रथम वाहनातच जीवे ठार मारले. व त्यानंतर वाहन पलटी केले अशी फिर्याद दिल्याने पतीसह पाचोरा पोलीस स्टेशनला पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीस ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा शून्य क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, www.livetrends.news पाचोरा शहरा लगत असलेल्या राजीव गांधी कॉलनीतील रहिवाशी मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) याचा विवाह धुळे येथील साई प्रसाद कॉलनी येथील अश्विनी दिपक शेलार हिचे सोबत दि. १४ मे २०१९ रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटात झाला होता. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांनी अश्विनी हिचा पती, सासू व नणंद यांनी छळ सुरु केला. तसेच पती मुकेशने नासिक येथील कुंदा भागवत सहाणे हिच्याशी माझे प्रेम संबंध आहेत. मला तु आवडत नाही. असे सांगितले. तद्नंतर अश्विनी ही सासरी नांदत असतांनाच कुंदा सहाणे ही पाचोरा येथे येऊन राहू लागली व त्यांनतर अश्विनी हिला तिघी नणंदा व सासू नेहमी हिणवुन व शिवीगाळ करून मारहाण करू लागल्या. तर पती मुकेश याने स्विफ्ट डिझायर गाडी घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर मी तुला मारून टाकेल अशी धमकी देत असल्याने अश्विनी तिची आई संगीताबाई दिपक शेलार हिस भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
दरम्यान, काही दिवसांनी मुलीस जास्तच त्रास होत असल्याने मुलीचे आई – वडील पाचोरा येथे येऊन मुकेश, सुमनबाई रमेश सोनवणे (आई), सविता दिनेश मराठे (नणंद), कविता रमेश सोनवणे (नणंद), रेखा वाडेकर (नणंद) यांची समजूत घालत असतांना त्यांनी काही एक ऐकून न घेता तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये आणून द्या नाहीतर आम्ही मुकेशचे लग्न कुंदा भागवत सहाणे हिच्याशी लावून देऊ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. www.livetrends.news यामुळे तिच्या पालतकांनी आपल्या मुलीला धुळे येथे नेले. त्यांनतर २२ एप्रिल २०२१ रोजी मुकेश मिस्त्री (सोनवणे) हा धुळे येथे येऊन मी अश्विनीस यापुढे चांगले वागवेल असे लेखी हमीपत्राद्वारे लिहून दिल्यानंतर त्यांनी अश्विनी हिला पाचोरा येथे पतीसोबत पाठविले.
दरम्यान मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) हा दि. २३ मे रोजी रात्री सोयगाव येथे राहत असलेल्या त्याची बहीण कविता रमेश सोनवणे हिच्याकडे अश्विनी हिस घेऊन जाण्याचा बहाणा करून एम. एच. १५ ई. ई. ०७८७ (क्रेटा) या पांढर्या रंगाच्या चारचाकी गाडीतून घेऊन गेला. थोड्याच वेळात तालुक्यातील आंबे वडगाव गावापासून काही अंतरावर गाडी पलटी होऊन त्यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे सासरे दिपक पांडुरंग शेलार यांना कळविले. यामुळे तिच्या माहेरच्या मंडळीन पाचोरा येथष धाव घेतली.
मात्र गाडी पलटी होऊन मुकेश यास साधे खरचटले सुध्दा नाही तर अश्विनी हिच्या डोक्यावर, उजव्या हातावर, पाठीवर मोठ्या जखमा असून तिची कवटी फुटल्याने तिचा जागेवर मृत्यू झालेला होता. यामुळे अश्विनीचा अपघात नसून तिचा खून झाल्याचे दिसून आले. यामुळे या मृत्यूस कारणीभूत धरून अश्विनी हिची आई संगिता दिपक शेलार यांनी पती मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे), सासू सुमनबाई रमेश सोनवणे (रा. पाचोरा), नणंद सविता दिनेश मराठे (रा.भडगाव), रेखा वाडेकर (रा.जळगाव), कविता रमेश सोनवणे (रा. सोयगाव) आणि कुंदा भागवत सहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला www.livetrends.news आहे.
मयताच्या शवविच्छेदनासाठी दिरंगाई
अश्विनी मुकेश सोनवणे हिचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूदेह दि.२४ रोजी मध्यरात्री पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र दुसर्या दिवशी सायंकाळ होऊनही तिचे वडील दिपक पांडुरंग शेलार यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील मेडिकल कॉलेजात नेणार असल्याचा हट्ट धरला होता. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू न देण्याचा आग्रह धरल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचोरा येथेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले.
आरोपी पतीला कोरोनाची लागण
मयत अश्विनी हिचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मुकेश याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने मला कोरोना झाल्याचा भास होत असून मी दोन दिवसांपूर्वी स्वॅब दिलेला आहे. असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची रॅपिड टेस्ट करून घेतली असता त्यात मुकेश याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यामुळे आता त्याला रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. www.livetrends.news