पाचोरा प्रतिनिधी । हरीद्वार येथे होणार्या कुंभमेळ्याचा भाविकांना घरीच शाही स्नानाचा लाभ व्हावा म्हणून तालुक्यातील निंभोरी येथे गंगाजल वाटपाचा उपक्रम घेण्यात आला.
यावर्षी हरिद्वार येथे कुंभमेळा होत आहे. यानिमित्ताने भाविकांना घरीच शाहीस्नानाचा लाभ मिळावा. म्हणुन दि. ७ मार्च रोजी निंभोरी ता. पाचोरा येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यात जेथे जेथे गायत्री परिवाराचे केंद्र आहे, त्या परिसरातील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी २४ घरी जाऊन त्या – त्या घरी हरिद्वार येथील गंगाजल व सोबतच वेदमाता श्री. गायत्री प. पु. गुरुदेव व वंदनीय माताजी यांचे छायाचित्र असलेला एक फोटो वितरित केला जात आहे. गंगाजल व फोटोची देवघरात स्थापना करून शाहीस्नान तिथीला त्या गंगाजलातील दोन थेंब बादलीभर पाण्यात टाकून भाविकांना स्नान करता येणार आहे.
यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी भक्तिभावाने प्रतिसाद दिला. यावेळी विजया मोराणकर, आश्लेषा निगडे, प्रणिता येवले, सिंधुताई पाटील, मंगला पाटे, मालती अमृतकर, लता ठाकरे, रजनी परदेशी, सुभद्रा परदेशी, नलिनी भावसार, संगिता पाटील सह गायत्री परिवार पाचोरा च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.