पाचोरा प्रतिनिधी । शहरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून शनिवारी रात्री उशीरापर्यंत बहुतांश भागात वीज नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.
पाचोरात शहरात शनिवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. कोरोना महामारीमुळे नागरिक आधीच हैराण झाले असुन त्यातच विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहर वासीयांना अजुन एक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे कोरोना महामारीने थैमान घातले असुन शहरासह ग्रामीण भागात पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात सर्व सामान्य नागरिकांना न पेलावणारा हॉस्पिटलचा खर्च पाहता अनेक जण घरीच क्वारंटाईन आहेत त्यातच विजेचा लपंडाव सुरू असुन शहर वासीयांना अजुन एका समस्येस सामोरे जावे लागत आहे. सर्वत्र लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असतांनाच शनिवारी दिवसभर शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहर वासीय संतप्त झाले आहेत.
गेल्या महिनाभरापुर्वी विज वितरण कंपनीने आपले मार्च एडींगचे लक्ष साधण्यासाठी गोरं – गरीब, हात मजुर यांचेकडुन विज कनेक्शन कट करण्याच्या धमक्या देवुन विज बिल भरुन घेतले. अनेकांकडे विज बिल भरण्याचे पैसे नसल्यामुळे उसनवारीने, तर काहींनी व्याजाने पैसे घेऊन विज बिल भरली. मात्र मार्च एडींगचे टार्गेट पुर्ण होताच विज वितरण कंपनीने आपले काम दाखविण्यास सुरुवात केली असुन त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरु असुन काही वेळ लाईट आली परंतु ती डीम लाईट असल्याने शहर वासियांना उकाडा सहन करावा लागत आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत हाच प्रकार सुरू असून किमान रविवारी तरी सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.