पाचोरा भडगावात रा.काँ.चे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ रॅली

pachora news

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ बुधवारी तालुक्यातील विविध गावांमध्ये संजय वाघ आणि भूषण वाघ यांनी समर्थकांनी भेटी देवून गावातील समस्या जाणून घेत त्यांनी मतदारांना परिवर्तनाची साद घातली.

यावेळी नगरपालिकेचे गटनेते संजय वाघ यांनी संजय वाघ यांनी भडगाव पेठेमध्ये नागरिकांशी संवाद साधला तर नगरपालिकेचे बांधकाम सभापती भूषण वाघ यांनी पाचोरा शहरातील विविध भागात प्रचार रॅली काढून थेट नागरीकांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद सांधला. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासकामांचा आढावा देत मतदारांना परिवर्तनाची साद घातली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content