Home क्राईम दुचाकींची समोरा-समोर धडक, दोन ठार; दोघे जखमी

दुचाकींची समोरा-समोर धडक, दोन ठार; दोघे जखमी

0
28

पाचोरा प्रतिनिधी । शहरातून जाणार्‍या रेल्वे पुलावर दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली असून यात दोन तरूण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत.

पाचोरा शहरातील रेल्वे पुलावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलावर मोटारसायकल (क्र. एम.एच.१९/डी.एफ.८५५६) आणि मोटारसायकल (क्र. एम.एच २०, ई.आर. ८७४५) यांचा समोरासमोर अपघात झाला. यात योगेश दिलीप उर्फ बाबा नागणे (वय ३१, रा.कालिका नगर पाचोरा ),संतोष अजिनाथ सातपुते वय (२५ रा. बोरनार तांडा ता.सोयगाव) या दोन्ही तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound