पाचोरा प्रतिनिधी । दिल्ली अखिल भारतीय प्रतिभा साहित्य तथा राष्ट्रीय सन्मान संमारंभात आज १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला. राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाचोरा येथील लाईव्ह ट्रेन्ड न्यूजचे प्रतिनिधी गणेश शिंदे यांचा राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
आज सकाळी 11 वाजता दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानव अधिकार आयोग सदस्य ज्ञानेश्वर मुळे हे होते. विशेष उपस्थितीत राष्ट्रीय भटके जाती कल्याणकारी आयोग राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक सेल असिस्टंट कमिशनर डॉ लिगा राजु यांच्यासह राज्यसभा सदस्य डॉ.नरेंद्र जाधव, राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे, केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव, धुळे, नंदुरबार विभाग प्रमुख व लाईव्ह ट्रेन्ड न्यूजचे प्रतिनिधी गणेश जनार्धन शिंदे यांचा माजी राज्यपाल अमलोक रतन कोहली यांच्याहस्ते ‘राष्ट्रीय समाज गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह विविध राज्यातील सेवेत असलेले शासकीय केंद्रीय अधिकारी कर्मचारी अभिनेते, लेखक, साहित्यिक, कवी, डॉक्टर, वकील, पत्रकार, संस्थाचालक याना सामाजिक कार्याचा प्रस्ताव मागवून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. गणेश शिंदे यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून शासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, धार्मीक अश्या विविध विषयावरील लेख वार्तापत्र वर्तमानपत्रातून प्रकाशित करून जनजागृती केली आहे.