पाचोरा राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील यांचे निधन

पाचोरा प्रतिनिधी । येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व तालुका चिंचखेडा येथील माजी उपसरपंच अनिल जगन्नाथ पाटील (वय – ५२) यांचे आज दि. ०५ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबई येथे उपचार घेत असतांना दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दि.६ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचे मूळ गावी चिंचखेडा येथे होणार आहे.

पाचोरा तालुका युथ काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष असलेले अनिल पाटील हे अत्यंत मितभाषी व पंचक्रोशीतील लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने चिंचखेडा –  पाचोरा परिसरावर शोककळा पसरली आहे.  चिंचखेडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शासकीय कंत्राटदार सुनील जगन्नाथ पाटील यांचे ते भाऊ होते. अनिल पाटील यांचे पश्चात दोन बहिणी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

 

 

Protected Content