Home क्राईम पाचोऱ्यात मनसेच्या सभासद नोंदणी अभियान

पाचोऱ्यात मनसेच्या सभासद नोंदणी अभियान


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर १७ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेतर्फे “महासंपर्क” सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष शुभम पाटील, शहर अध्यक्ष ऋषीकेश भोई, शहर सरचिटणीस कृष्णा दुनदुले, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, तालुका संघटक जितेंद्र नाईक, शहर संघटक निलेश मराठे, हर्षल अहिरे, दिपक ठाकुर यांनी सुमारे १०० नुतन विद्यार्थी सभासद नोंदणी करुन घेतली.

२० जुलै रोजी अमित ठाकरे हे जळगांव दौऱ्यावर येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “महासंपर्क” म्हणुन नविन सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने एम. एम. महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेतर्फे सुमारे १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची सभासद नोंदणी करुन घेण्यात आली.


Protected Content

Play sound