पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवश्याची बॅग अनावधानाने रेल्वेत राहिल्याने पाचोरा लोहमार्ग पोलीस आणि ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या मदतीने बॅग परत मिळाल्याचे समाधान प्रवाशी व्यक्त केले.
सविस्तर असे की, प्रवीण पाटील हे आज काशी एक्सप्रेसच्या बोगी नं.एस-5 मधून बॅग न घेता खाली उतरले. व रेल्वे भुसावळकडे निघाली. मात्र आपली बॅग रेल्वेत राहिल्याचे प्रविण पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जीआरपीएफच्या कार्यालयात जावून हकीकत सांगितली. जीआरपीएफचे पोलीस ईश्वर बोरूडे यांनी माहिती घेवून तत्काळ भुसावळातील रेल्वे सल्लागार भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी कळविले. त्यानुसार दिलीप पाटील यांनी गृपचे सदस्य भानुभाऊ यांच्या सहकार्याने एस-5 या बोगीत जावून राहिलेली बॅग ताब्यात घेवून जळगाव रेल्वेस्थानकावर उतरले. व पाचोरा येथील जीआरपीएफ कार्यालयात येवून बॅग दिली. त्याच्या बॅगेत एक लाख 10 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, 30 हजार रूपये किंमतीचा टॅबलेट व इतर महत्वाच्या मौल्यवान वस्तू होत्या.
यावेळी लोहमार्ग पोलीस अधिकारी सपोनि रमेश वावरे यांनी प्रवीण पाटील यांची व बॅग मधील संपूर्ण वस्तूंची उलट तपासणी, ओळख पूर्ण करून संबंधितांस संपूर्ण बॅग दिलीप पाटील, पोलीस कर्मचारी ईश्वर बोरुडे, आरपीएफ पोलीस निरीक्षक संजीव पाटील साहेब, दिनेश पाटील, धनगर व इतर पोलीस कर्मचारी यांच्या समवेत प्रवीण पाटील यांच्या ताब्यात दिली. यामधील सर्वांनीच व्यापारी भानुभाऊ यांचे आभार मानले.