भडगाव प्रतिनिधी । पाच वर्ष मिळालेल्या संधीचे आपण सोने केले असुन तालुक्याचा चौफेर विकास साधला आहे. भडगाव तालुक्यात 132 सबस्टेशन, एमआयडीसी, रस्ते, गिरणा नदिवर दोन ठीकाणी पुल, शहरासाठी गिरणा धरणातुन पाणी आरक्षण आदि महत्वाच्या प्रश्न सोडविले आले. तर आगामी काळात शहरासाठी 65 कोटीची पाणीपुरवठा योजना व गिरणा नदिवरील बलून बंधारे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ते ही लवकरच पुर्णत्वास येतील, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी केले. ते भडगाव येथील नारायणभाऊ मंगल कार्यालयात आयोजित व्यापारी मेळाव्यात बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रकाश भंडारी होते.
व्यासपीठावर माजी नगरध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, नगरध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, व्यापारी छोटुभाऊ जैन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, पंचायत समीतीचे सभापती रामकृष्ण पाटील, मास्टरलाईनचे समीर जैन, सहसंपर्कप्रमुख संजय पाटील, दिलीप मराठे, प्रकाश भंडारी, मेडीकल असोसिएशन चे सुरेश भंडारी, उपनगरध्यक्ष डॉ. वसिम मिर्झा, देविदास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. विलास पाटील, सहकार सेलचे युवराज पाटील, माजी नगरध्यक्ष शशिकांत येवले, सुनील देशमुख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इमरान अली सय्यद, स्विकृत नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, पवन अग्रवाल, बात्सरचे संजय पाटील, वाड्याचे जालिंदर चित्ते, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, जगन भोई, सौरभ पाटील, भाउसाहेब भोसले, आबा चौधरी, युवासेनेचे जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, प्रदिप महाजन, सुनील महाजन, शिवदास महाजन, युवासेनेचे निलेश पाटील आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न पुर्णपणे निकाली काढण्यात आपल्याला यश आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमाने दुर्लक्षित रस्त्याचे काम मार्गी लावले. कजगावला 21 कोटीचा उड्डाण पुलाचे कामं मंजुर केले. पाढंरद ते निंभोरा दरम्यान गिरणा नदिवर पूलाचा मार्गी लावला. तर भडगाव ते जुने वाक रस्त्यावरही गिरणा नदिवर नाबार्ड कडुन पुलाला मंजुरी मिळाली आहे. गुढ ते नावरे व जुने मटन मार्केट ते भडगाव पेठ भागाला जोडणार गिरणेवरील पुल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय भडगाव तालुक्यात स्वातंत्र्यानंतरही 132 केव्ही वीज सबस्टेशन नव्हते. मी विधानभवनात उपोषणाला बसवून हा प्रश्न मार्गी लावला. त्याबरोबरच वडजी, लोणपिराचे, वडधे येथे 33/11 सबस्टेशनचे उभारण्यात यश आल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, भडगाव तालुक्यात एमआयडीसी ला ही मंजुरी मिळविण्यात यश आले. त्यामुळे येथे आगामी काळात मोठे उद्योग उभे राहून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भडगाव ग्रामीण रूग्नालयाला उपजिल्हा रूग्नालालयाचा दर्जा मिळविता आले. एवढेच नाही तर त्यासाठी निधीही मंजुर झाला आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत भडगाव शहरात तिनं कोटींचे गिरणा काठावर कामं सुरू आहे. मैत्रियेच्या ठेवीदारांठी आपण लढा दिला आहे. त्यांना पुढच्या टप्प्यात ठेवी परत मिळतील अशा स्टेज आली आहे. आता आगामी काळात शेतरस्ते करण्यावर आपला भर असणार आहे. याशिवाय गिरणा नदिवर बलून बंधारे अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यावर आपला भर असेल. शहरासाठी 65 कोटीची पाणीपुरवठा योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे, तिला मंजुरी मिळवून शहराला 24 तास पाणी देण्याच्यादृष्टीने आपले प्रयत्न असणार आहेत. तर भडगावला प्रस्तावित आरटीओ कार्यालय करण्यासाठी कंबर कसु असे त्यांनी आपल्या भाषणातुन सांगीतले. दरम्यान यावेळी गणेश परदेशी, समीर जैन, सौरभ पाटील , महेश मोरणकर, सुरेश भंडारी, दिलीप मराठे या व्यापाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. मेळाव्याला व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.