Home क्राईम पाचोरा येथील पत्रकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पाचोरा येथील पत्रकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
53

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील कृष्णापूरी येथील ४५ वर्षीय पत्रकाराचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, कृषापुरीतील रहिवाशी तथा फोकस न्युजचे मुख्य संपादक सचिन (बाला) मधुकर पाटील (वय ४५) यांचे आज पहाटे २ वाजेच्या सुमारास मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सचिन पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार असून ते गो. से. हायस्कूलचे शिक्षक रुपेश मधुकर पाटील यांचे लहान बंधू होते. सचिन पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound