Home Cities पाचोरा पाचोर्‍यातील जोशी कुटुंबाकडे राम मंदिरासह कोविडची आरास ( व्हिडीओ )

पाचोर्‍यातील जोशी कुटुंबाकडे राम मंदिरासह कोविडची आरास ( व्हिडीओ )

0
72

पाचोरा प्रतिनिधी । येथील उदय जोशी यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासह कोविडवर करण्यात येणार्‍या उपचारांबाबत आरास केली असून आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी याला भेट देऊन जोशी कुटुंबाचे कौतुक केले.

सध्या कोरोनाच्या महामामारीत सर्वच घटक आपली सेवा देत आहेत. याच धर्तीवर उदय जोशींनी कोविड आजाराच्या प्रसंगाला साजेशी व त्याच जोडीला प्रभु श्रीराम मंदिराचा सभामंडप व परिसर हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. कोरोनाच्या प्रसंगात मन खंबीर होणे आवश्यक आहे. यासाठी आध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड अभिप्रेत असून याकरिता ही आरास बोलकी आहे. उदय जोशींनी लोकमान्य टिळकांच्या विचारांना अपेक्षित गणपती आरास केली आहे. असे गौरोदगार खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाचोरा येथील कॉलेज रोड वरील विश्राम गृहाकडे जाणार्‍या रस्त्याजवळ रहिवाशी असलेले दिनेश जोशी यांचे चिरंजीव उदय जोशींनी ही हृदयस्पर्शी गणपती आरास साकारली आहे.

आज या गणपती देखाव्याला खासदार उन्मेषदादा पाटील यांनी भेट दिली यावेळी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे , दिनेश जोशी व त्यांच्या परिवारातील कोमल जोशी, सुरेखा जोशी, छाया जोशी, कुमार जोशी, उमंग दिदी जोशी आदी सदस्य उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/329205258327003


Protected Content

Play sound