पाचोरा प्रतिनिधी । झारखंड मधील मतदारांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला प्राधान्य देत कॉग्रेस आघाडीला घवघवीत यश संपादन करुन दिल्याने पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉग्रेस आय ला घवघवीत यश मिळाले बहुमताचा आकडा पार झाल्यावर भारतात 75 टक्के सत्तेतुन 30 ते 35 टक्के सत्ता आता भाजपा ताब्यात आहे. झारखंडची जनता धनशक्ती पुढे झुकली नाही म्हणून बहुमत कॉग्रेस आघाडीला दिल्याबद्दल येथील कॉग्रेस चे राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी, कॉग्रेस तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक विधानसभा उपाध्यक्ष शकील शेख, महीला तालुका अध्यक्षा कुसुमताई पाटील, जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, अॅड. मनिषा पाटील,शेख आबीद शेख आजीज, सलमान टकारी, मुजाहिद शेख फारुख, आशीफ मिस्तरी, इस्राईल बागवान, समद मनियार, प्रकाश गोसावी, प्रमोद पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.