पाचोरा-भडगाव रोटरी क्लबतर्फे पूरग्रस्तांना मदत

पाचोरा प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव या सेवाभावी संस्थेतर्फे कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीची मदत म्हणून ६० अन्नधान्य पाकिटे रवाना करण्यात आले आहेत.

कोकणातील भयावह पूरपरिस्थिती लक्षात घेता तेथे अनेक कुटुंबे विस्थापित झालेली आहेत. या नैसर्गिक संकटात शासनातर्फे मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव या संस्थेतर्फे अत्यावश्यक अन्न-धान्य घटकांची एकूण ६० पाकिटे दि. २८ जुलै रोजी रवाना करण्यात आले.  पाचोरा येथील राजे संभाजी युवा फाउंडेशन प्रणित “आधारवड” या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधारवड संस्था दि. २९ जुलै रोजी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना ही मदत सुपूर्द करणार आहे. 

रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेल्या फुड पॅकेट्स मध्ये आटा, गोडेतेल, तांदूळ, तूरडाळ, साखर, चहा आदी अत्यावशक चीज वस्तूंचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे रोटरी क्लब तर्फे आधारवडच्या युवा पदाधिकाऱ्याकडे  ही सर्व अन्न पाकिटे सुपूर्द करण्यात आली. 

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, सचिव रो. प्रा. पंकज शिंदे, उपप्रांतपाल रो. राजेश मोर , रो. चंद्रकांत लोडाया , रो. डॉ. अमोल जाधव, रो. डॉ. गोरख महाजन, रो. शिवाजी शिंदे , रो. निलेश कोटेचा व आधारवडचे प्रतिनिधी भूषण देशमुख, प्रवीण पाटील, महेंद्र रायगडे, राहुल पाटील, रवींद्र देवरे आदी उपस्थित होते व तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे गोपाल पाटील व हर्षल अहिरे यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content