पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी मतदार संघातील गावासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. सदर विकासकामांना प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून, विकासकामे तातडीने करण्यात येणार आहे.
पाचोरा तालुक्यातील कामे
नगरदेवळा येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), माहेजी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), पिंपळगाव हरेश्वर येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदाड येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वरखेडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), गाळण बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा खु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष).
भडगाव तालुक्यातील कामे
आडळसे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), जुवार्डी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), पेडगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वलवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), महिंदळे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष), सावदे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (७ लक्ष),कोळगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष),पिंप्रीहाट येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष) याप्रमाणे कामे होणार आहे. मतदार संघामध्ये एवढ्या मोट्या प्रमाणावर सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल गावातील नागरिकांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहेत.