पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 9 कोटींचा निधी मंजूर

 

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी, म्हणून आमदार किशोर पाटील यांनी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला. तसेच ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना. दादाजी भुसे यांची वारंवार त्यांच्या दालनात भेटी घेतल्यामुळे रस्ताच्या समस्या लक्षात आणून दिल्यामुळे प्रशासनाने यावेळ तातडीने निर्णय घेतला असून रस्ता सुधारणेसाठी ०९ कोटी निधी मंजूर झाले, असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी की, लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल. आ. किशोर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यास यश प्राप्त झालेले असून, पाचोरा भडगाव तालुक्यातील रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ (लांबी ६.५४ कि.मी) ३६१.८८ रुपये, लोहारी खु. ते लासुरे रस्ता (लांबी १.६८ कि.मी) ११७.१२ रुपये, भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९ रुपये, कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये, आदी गावांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ०९ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्ता मजबुतीकरण व सुधारणेसाठी मंजुर झालेले आहे. आ. किशोर पाटील यांनी मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मा.ना.गिरीष महाजन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जळगाव, मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री, आदी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. परिसरातील नागरिकांनी आ. पाटील यांचे अभिनंदन केले. यामुळे शहारात आनंद व्यक्त केला जात असून आ. पाटील यांचे कौतुक केले आहे.

Protected Content