पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेच्या दोन्ही गटांतर्फे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाचोर्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून वैशाली सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आधारवड येथील गोरगरीब नागरीकांना गोड पदार्थांचे जेवन देण्यात आले.
यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा परीषद सदस्य पदमसींग पाटील, युवा नेते सुमित किशोर पाटील, गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख धर्मेंद्र चौधरी, गंगाराम पाटील, बापू हाटकर, जितेंद्र पेंढारकर, नितीन चौधरी सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, आज शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख रमेश बाफना, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, खंडू सोनवणे, पप्पू राजपूत, दत्ता जडे, फईम शेख, शहरप्रमुख ऍड. दिपक पाटील, अनिल सावंत, आनंद पाटील, जितेंद्र जैन, अभिषेक खंडेलवाल, ज्ञानेश्वर चौधरी, हिमांशू सोनवणे, प्रतिक पाटील, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, अनिता पाटील, प्रकाश जाधव, संजय धुमाळ, मधुकर पाटील, अतुल पाटील, नाना वाघ, जीवन मराठे उपस्थित होते.