पाचोरा (प्रतिनिधी) येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरा केली जात आहे. आज सकाळी १० वाजता स्टेशन रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे. सकाळी प्रांत, तहसीलदार, नगराध्यक्ष यांच्यासह विविध सामाजिक संघटनासह सामन्य नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
डॉ. आंबेडकर यांना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार गणेश मरकडं , नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्य अधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्य अधिकारी राजेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, यांनी अभिवादन केले. तसेच संभाजी तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, विर मराठा मावळा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश शिंदे मराठा सेवा संघाचे नगरसेवक विकास पाटील, राजू पाटील, राहुल बोरसे, माळी समाजाचे अध्यक्ष संतोष महाजन, एन. आर. ठाकरे, एस. के. पाटील, चंदू चौधरी ए. बी. अहिरे, विजय जाधव, प्रदीप पाटील, असिफ खाटीक, विशाल बनसोडे, मनीष काबरा, रवींद्र पाटील, सुनील सराफ, वसंत महाजन, माजी नगरसेवक राजू भोसले, सुनील पाटील, मुकेश तुपे, सुनील शिंदे यांच्या सह अनेक सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उत्सव समिती तर्फे सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून विविध ठिकाणी कार्यक्रमाला सुरू देखील झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जीवन चारित्र्य वर एस .ए. पाटील व रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मिलींद नगर मित्र मंडळ शालेय विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथक मिरवणूक काढण्यात आली.