पाचोरा (प्रतिनिधी)। शहरातील मिनी बसस्थानक मार्गावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी व विजेचे दिवे लावण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि नागरिक यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या भागात परधाडे, भातखंडे, अतृर्ली, वडगाव या ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची व बाजारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्यांची स्वच्छतागृहांअभावी मोठी कुचंबणा होत असते. तसेच रात्री दिवे नसल्याने या रस्त्यावर त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे वरीलप्रमाणे मागणी केली जात आहे. या मार्गावरूनच दररोज प्रवास करीत असलेले भाजपचे पं.स. सभापती बन्सीलाल पाटील, शिवसेनेचे जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील व नगरसेवक यांनी आ. किशोर पाटील यांच्याशी चर्चा करून वरील प्रश्न मार्गी लावायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचोरा येथे बसस्थानक रस्त्यावर स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी
6 years ago
No Comments