मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचाच नव्हे तर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि काही निटवर्तीय कार्यकर्त्याचा फोन देखील टॅप करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये असतांनाच त्यांचा फोन टॅप करण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आलेली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह नाथाभाऊंचा फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच प्रकरणी काल खडसे यांनी कुलाबा पोलीस स्थानकात आपला जबाब नोंदविला. याप्रसंगी खडसे यांनी आपला फोन टॅप करण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त करतांनाच या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आपला फोन टॅप करण्यात येत असावा अशी आपल्याला आधी देखील शंका होती. तसेच या प्रकरणी आपण २०१९ मध्येच चौकशीची मागणी केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहायक तसेच त्यांच्या एका निटवर्तीय कार्यकर्त्याचा फोन देखील टॅप करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यातील पीए यांच्याकडे नाथाऊंशी संबंधीत कार्यक्रमाचे नियोजन असून तसेच एक कार्यकर्ता हा त्यांच्या अतिशय जवळचा असून त्यांचा देखील फोन टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत साम टिव्हीने वृत्त दिले आहे. या प्रकरणी आता नवीन गुन्हा दाखल होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.