दुचाकीला उडविले : जळगावचे दोघे मित्र ठार

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जळगावातील दोघे मित्र ठार झाल्याची घटना तालुक्यातील अडावद गावाजवळ घडली.

या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, अडावद गावाजवळ गुरूवारी सायंकाळी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जळगाव येथील दोघे तरूण ठार झाले. ईश्वर सुदाम सुरळकर व योगेश सुकलाल भावसार हे दोन्ही मित्र दुचाकीने (क्र.एम.एच.१९-डी.एच. ९७६९) चोपडा येथून जळगावला निघाले होते. त्यांच्या गाडीला देशमुख विद्यालयाच्या जवळ एका अज्ञात वाहनाने उडविले. यात ईश्वर सुदाम सुरळकर (वय ३५, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. तर योगेश सुकलाल भावसार (वय ३४, रा.जगवाणीनगर, जळगाव) हा जखमी झाला होता. प्रथमोपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र त्याचाही मृत्यू झाला.

या संदर्भात रात्री उशीरापर्यंत चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content