जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील आणि ए.टी.झांबरे विद्यालयात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
गुरूवर्य प.वि.पाटील विद्यालय
सर्वप्रथम शाळेचे शालेय समन्वयक के.जी.फेगडे मुख्याध्यापिका रेखा पाटील, अध्यापिकाचार्य शालिनी तायडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपशिक्षक योगेश भालेराव यांनी महापरिनिर्वाण म्हणजे काय याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले तर नेमीचंद झोपे, छात्रअध्यापिका दीपाली बाविस्कर, सुधीर वाणी यांनी सहकार्य केले. यावेळी अर्णव केदार, आयुष बारी, अजिंक्य विसपुते, शाश्वत कुलकर्णी, विजयश्री चौधरी, पाटील शिंपी, दिव्यांशु चौधरी, हर्ष शिंपी, दीक्षा पाटील या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीला शाळेचे जेष्ठ शिक्षक नरेंद्र पालवे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रष्णगिरी गोसावी, जास्वंदी कुलकर्णी, सुजल चौधरी, श्रीकांत देवरे,यश सोनवणे, सुमित साळुंके, हितेश शिंपी, चैतन्या सपकाळे, सिद्धी मेटकर, साक्षी ढाके, भाग्रवी भंगाळे, ईशा पाटील, अदिती कोलते, सृष्टी महाजन, साक्षी बाविस्कर, प्रणाली नारखेडे, दामोदर चौधरी, हिमांशु शिसोदे, आदित्य विसपुते, तुषार पाटील, चैतन्य बडगचजरया विद्यार्थ्यांनी डॅ आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध प्रसंगाचे कथन केले. कार्यक्रमाला शालेय समन्वयक के.जी.फेगडे, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, वर्षा राणे, रोहीणी चौधरी, सतिश भोळे, सुचेता शिरसाठ, वंदना मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती सोनवणे हीने केले.तर आभार प्रदर्शन पायल थोरात या विद्यार्थ्यांनीने मानले.