जळगाव प्रतिनिधी । देशावर चार महिन्यांपासून आलेल्या संकटाशी लढ्याकरता पी.एम. केअर निधीची स्थापना केली. पी.एम.केअर फंडामध्ये अब्जावधी रुपयांच्या रूपाने जमा झालेले आहेत. या जमा खर्चाचा जाहीर हिशोब द्या, अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे.
देशावर चार महिन्यांपासून आलेल्या संकटाशी लढ्याकरता पी.एम. केअर निधीची स्थापना केली. हा संपूर्ण निधी एका चारीटेबल ट्रस्टच्या नावाखाली स्थापन केला. गेल्या तीन महिन्यांपासून या निधी मध्ये देशभरातून तसेच परदेशातून मोठमोठे उद्योगपती, खाजगी कंपन्या, सरकारी कंपन्या, सरकारी कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक तसेच आमदार-खासदार, मंत्री इतकेच नव्हे तर लहान मुलांनी आपल्या खाऊ’साठी जमा केलेले पैसे सुद्धा निधी स्वरूपात पी.एम. केअर फंडामध्ये अब्जावधी रुपयांच्या रूपाने जमा झालेले आहेत. या जमा खर्चाचा जाहीर हिशोब द्या अशी मागणी एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे
केंद्र सरकारकडे इतके पैसे जमा झाल्यानंतर सुद्धा कोरोना संकटांमध्ये रुग्णांना मात्र कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनामध्ये पीएम केअर निधीबाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत
पी.एम. केअर फंडातील पहिल्या १० सर्वात जास्त देणगी देणाऱ्या दात्यांची नावे काय?, पीएम केअर फंडामध्ये आतापर्यंत किती रुपयांचा निधी जमा झाला आहे..?, पीएम केअर फंडातील खर्च करण्यात आलेल्या निधीचा संपूर्ण तपशील?, पीएम केअर फंडावर पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या 3 ट्रेस्टींची नावं ?, असे प्रश्न देवेंद्र मराठे यांनी या पत्रात विचारले आहेत .
अब्जावधी रुपयांचा निधी पी एम केअर फंडामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा देशातील कोरोना संकटामध्ये केंद्र सरकारने सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार वर देऊन स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम केले. नेमका पी एम केअर फंडातील निधीचा वापर भविष्यात मोदी सरकार आगामी येणाऱ्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीकरता करणार आहेत का ? याचा खुलासा मोदी सरकारने लवकरात लवकर करावा. पी एम केअर फंडामध्ये जमा झालेल्या रकमेतून कोरोणा या महा संकटामध्ये मोदी सरकारने व केंद्र सरकारने देशभरामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन रुग्णालय स्थापन का केली नाही..? लाखो रुपयांचे रुग्णांना कोरोना उपचाराचे बिल भरावे लागत आहे.
मग पीएम केअर फंडामधून देशातील रुग्णांना मोफत उपचार का होत नाही आहे.? ऑक्सीजन व व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होतो आहे, मग देशभरामध्ये पीएम केअर फंडामधून चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर न देता निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर का पुरवण्यात आले.? कोरोणा संकटकाळी देशातील लाखो नागरीकांचा रोजगार बुडाला त्यांना परत उभारणीसाठी पीएम केअर फंडातील या निधीचा वापर का होत नाहीये..? असे प्रश्न सामान्य जनतेच्या सुद्धा लक्षात येत असल्याचेही त्यांनी या पात्रात नमूद केले आहे .
पी.एम. केअर फंडाच्या नावाखाली भाजप पक्षाने केवळ आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फंड जमा केलेला आहे , असा अआरोपही या पात्रात करण्यात आला आहे. पी.एम. केअर फ़ंड जमा – खर्चाचा जाहीर खुलासा करा अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयूआय व काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्काच्या या पैशांसाठी मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मोदी सरकारला दिला.