धरणगावात कोरोनाचा संसर्ग वाढला; तालुक्यात ३५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

धरणगाव प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरला संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यात तालुक्यातून ३५ रूग्ण नव्याने आढळून आले त्यापैकी १९ रूग्ण धरणगाव शहरातील आहे, अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ३५ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. आढळून आलेल्यांमध्ये धरणगावात तब्बल १९ रूग्ण आज आढळून आले. त्यात लहान माळीवाड-१, पाताळेश्वर गल्ली-४, भाटीया गल्ली-७, मोठा माळीवाडा, गणाबप्पा नगर, परिहार चौक प्रत्येकी एक तर विद्यूत नगर-२ आणि हनुमान नगर-२ यांचा समावेश आहे. तर उर्वरित तालुक्यातील साळवा-२, खपाट-३, बोरगांव खर्द-१, बोरगाव बु-१, नांदेड-३, पिंपळे खूर्द-१, दोनगाव-१, एकलग्न-१, चांदसर-२ आणि चिंचपूरा-१ असे रूग्ण आढळून आलेत.

आजचे रूग्ण पकडून ९६० रूग्ण झाले असून यापैकी ३७ रूग्ण मयत झाले, ७०० रूग्ण बरे झाले असून उर्वरित २२३ रूग्ण हे उपचार घेत आहे. अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

Protected Content